महाराष्ट्रात झालेल्या 66796 टेस्टपैंकी 95% टेस्टचा अहवाल आला निगेटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-116.png)
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे…त्याचप्रमाणे आता भारतात आणि महाराष्ट्रात ही कोरोनाने त्याचं जाळ मजबूतच विणायला सुरवात केली आहे… आतापर्यंत महाराष्ट्रात ६६७९६ टेस्ट झाल्या आहेत. चांगली गोष्ट ही की यातील ९५ टक्के टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.
टेस्टसाठी लागणारा काळ कमी होऊ शकत नाही. परंतु, गंभीर रुग्णांच्या टेस्ट लवकर करण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणतेही लक्षण म्हणजे सर्दी, खोकला, ताप आला तर लपवू नका. लवकर दवाखान्यात या, म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवता येईल, असे आवाहनही त्यांनी केले. सुमारे ६७ हजार टेस्टपैकी ३०६६ रुग्ण आढळून आले आहेत. अनेक जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी डॉक्टरांनाही आवाहन केले. कोरोनाची लागण न झालेल्या रुग्णांसाठी दवाखाने सुरु करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं तर नक्कीच आपण कोरोना दूर ठेवू शकतो, हे सुदधा मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितलं.