breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा आरक्षण: २५ जानेवारीला मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी होणार

नवी दिल्ली – मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी आज (९ डिसेंबर) सुप्रिम कोर्टात ५ न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली. दरम्यान, अद्याप सुनावणी सुरु आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती तुर्तास हटवण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारच्या बाजूने मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला. २५ जानेवारीला मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणीपर्यंत नोकरभरतीला स्थगिती दिलेली कायम असणार आहे.

वाचा :-मराठा आरक्षण: आज सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी

मराठा आरक्षण स्वतंत्र रितीनं दिले गेलं, ओबीसीतून मराठा समाजााला आरक्षण नाही, मुकुल रोहतगी यांचा जोरदार युक्तीवाद, आयोगाच्या शिफारशीनं आरक्षण मिळालं, मराठा आरक्षणाला हायकोर्टानं सरंक्षण दिलं होत, तामिळनाडू राज्यात 69 टक्के आरक्षण, राज्यातील मागास वर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार, 50 टक्क्याची सील राज्याला विशेष परिस्थिती लागू होत नाही, असा मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला.

मराठा आरक्षणाला हायकोर्टाकडून संरक्षण, आयोगाच्या शिफारशीने आरक्षण मिळालं, 50 टक्के आरक्षणाची मर्यादा राज्याला विशेष परिस्थितीत लागू होत नाही, तामिळनाडू राज्यात 69 टक्के आरक्षण असल्याचा मुकुल रोहतगी यांचा सुप्रीम कोर्टात दाखला दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button