मराठा आरक्षणावरची पुढची सुनावणी १ सप्टेंबरला होणार
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणावर अंतिम सुनावणीला आजपासून (२७ जुलै) सुरुवात होणार होती. त्याप्रमाणे, आज न्यायालयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी देखील झाली. मात्र, यापुढची सुनावणी १ सप्टेंबरला होणार असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. “महाराष्ट्र सरकारने कोरोना संकटकाळात नोकर भरती न करण्याचा निर्णय घेतला घेतल्याने या प्रकरणाची अर्जन्सी नाही”, असे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे प्रकरण करण्यात अडचणी येत असल्याचेही मान्य करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आजपासून मराठा आरक्षण प्रकरणावर अंतिम सुनावणीला सुरुवात होती. त्याचप्रमाणे, ही सुनावणी पुढच्या ३ दिवसात पूर्ण देखील होणार होती. यावेळी युक्तिवादासाठी याचिकाकर्त्यांना दीड दिवस तर दुसऱ्या बाजूला दीड दिवस मिळणार होता. त्यामुळे, मराठा आरक्षणाचे हे प्रकरण लवकरच मार्गी लागेल असे म्हटले जात होते. मात्र, आता या प्रकरणाची पुढची सुनावणी