breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जळगाव मनपा आयुक्तपदी सतिष कुलकर्णी
जळगाव | काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. माधवी खोडे-चवरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून प्रभारी आयुक्त असल्याने विकासकामांना खोळंबा आल्याने आज नवीन आयुक्तपदी नगरपरिषद प्रशासन संचालनालय उपसंचालक सतिष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.माधवी खोडे-चवरे यांची काही दिवसापूर्वी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या जागी रिलिव्हर येत नसल्याने त्यांना त्याच जागी थांबण्याचे आदेश देण्यात आले असल्याने त्यांच्या जागी कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.