breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भूज-दादर एक्सप्रेसमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या

भूज-दादर एक्सप्रेसमध्ये एका महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घडना घडली आहे. ट्रेन दादर स्थानकात पोहोचल्यानंतर या महिलेची हत्या झाल्याचे लक्षात आले. या महिलेच्या अंगावरील दागिने आणि अन्य सामान गायब होते. दादीया देवी शंकर चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. लुटण्याच्या उद्देशाने ही हत्या झाली असून बोरीवली ते दादर दरम्यान ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यामध्ये या महिलेचा मृतदेह आढळला.

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादीया देवी या गुजरात सूरतच्या रहिवासी होत्या. मुंबईला त्या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी येत होत्या. गृहिणी असलेल्या दादीया देवी यांना नवरा आणि तीन मुले असा परिवार आहे. गुरुवारी रात्री ट्रेनमध्ये बसल्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीला फोनकरुन शुक्रवार सकाळपर्यंत मुंबईत पोहोचेन असे सांगितले.

दादीया देवी यांचे नातेवाईक त्यांना आणण्यासाठी दादर स्टेशनला पोहोचले. पण त्या कुठे दिसल्या नाहीत. त्यांच्याशी संपर्कही होत नव्हता. नातेवाईक स्टेशन परिसरात त्यांचा शोध घेत होते. अन्य प्रवाशांकडे त्यांनी विचारणा केली. त्यावेळी एका प्रवाशाने डब्ब्यामध्ये एका महिलेचा मृतदेह पाहिल्याचे सांगितले. ज्यावेळी नातेवाईकांनी पाहिले तेव्हा त्या रक्ताच्या थारोळयात पडलेल्या होत्या. रेल्वे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी दादर आणि ट्रेन थांबलेल्या अन्य रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button