भूकंप! पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, 3.5 रिश्टेर स्केल तीव्रता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Earthquake.jpg)
पालघर: पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भूकंपाची मालिका सुरुच आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात काल मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टेर स्केल इतकी होती. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे तीव्र धक्के जाणवत आहे. 11 सप्टेंबरला देखील मुंबई आणि नाशिक भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेले होते.
यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. दरम्यान 9 सप्टेंबरला देखील नाशिक आणि पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टेर स्केल इतकी होती. नाशिकमध्येही त्याच वेळेस पश्चिम दिशेच्या बाजूने 93 किमी दूर सौम्य भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे. पालघर, तलासरी, डहाणू हे भूकंप प्रवण आहे. मुंबई शहरापासून अवघ्या 100 किमीवर असणार्या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवतात. मागील 1-2 दिवसांत जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जीवीतहानी झाल्याचं वृत्त नसले तरीही घराला तडे गेल्याच्या घटना समोर आलेले आहे.