‘भारत बंद’ दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले ‘असे’ आवाहन
![The country's economy will be the fastest in the world in 2021-22 - Amit Shah](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/amit-shah-.jpg)
नवी दिल्ली : टीम ऑनलाईन
देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे. नियमावली पाठवताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना भारत बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासकांनी कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. सोशल डिस्टन्स राहिल याची काळजी घेतली पाहिजे, असे नमूद केले आहे.
शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. भारत बंद दरम्यान शांततेत निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने सातत्याने सांगितले जात आहे. काँग्रेससह देशभरातील 11 राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे.