breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भारत बंदचा जनजीवनावर कोणताही परिणाम नाही… बाजारपेठांसह,सार्वजनिक वाहतूकही सुरळीत…

मुंबई | महाईन्यूज |

देशभरातील विविध कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरण आणि देशविरोधी धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी हा संप करण्यात येत आहे. या बंदमध्ये देशातील दहा राष्ट्रीय कामगार संघटनांसोबतच सहा बँक संघटना सहभागी होणार आहेत. 25 कोटी लोक या बंदमध्ये सहभागी होतील, असा दावा संघटनांनी केला आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेला भारतीय कामगार संघ या संपात सहभागी होणार नाही.

दरम्यान भारत बंदच्या हाकेला सर्वच संघटनांचा पाठिंबा असल्यानं या देशव्यापी बंदचा परिणाम सर्वसामान्यांवर आणि वाहतूकीवर किंवा बजारपेठांवर होईल अशी शक्यता होती..मात्र तशा प्रकारे काहीही घडताना मात्र दिसत नाही आहे.

सर्व शाळा-महाविद्यालयं सुरु राहणार आहेत.. तसंच बंदला पाठिंबा द्यायचाच असेल तर शिक्षक, प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून आंदोलनाला पाठींबा द्यायचं ठरवलं आहे. यानंतर प्राध्यापक-शिक्षक आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होणार आहेत. काय आहेत मागण्या? बेरोजगारी हटवण्यासाठी सरकारने पावलं उचलावीत किमान मजुरीचे दर निश्चित करावेत कामगारांनी सामाजिक सुरक्षा मिळावी कामगारांना 21,000 रुपये एवढं किमान मासिक वेतन मिळावं बँक व्यवहार कोलमडण्याची शक्यता या भारत बंदमध्ये बँक कर्माचारीही सहभागी होणार असल्यामुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.

एटीएममधले पैसे संपेपर्यंतच ही सेवा सुरु राहिल. ज्या बँकेचे कर्मचारी भारत बंदमध्ये सहभागी होतील त्या ठिकाणी बँकेच्या कामांना विलंब लागू शकतो. तसेच 8 आणि 9 जानेवारी या दोन दिवसांमध्ये एटीएममध्येही पैशांचा तुटवडा जाणवू शकतो. ऑनलाईन सुविधा मात्र सुरळीत चालू असतील. …तर शिस्तभंगाची कारवाई महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जर का या संपात सहभाग घेतला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र सरकारने दिला आहे. महाराष्ट्र डीजीआयपीआरने याबाबत ट्वीट केलं आहे.

तसंच भाजीपाला आवकीवरही याबाबत कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाहीये. राजच्या प्रमाणेच आजही भाजीपाला गाड्यांची आवक झाली आहे. या बंद मध्ये माथाडी कामगार संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि एपीएमसी व्यापारी संघटनांचा सहभाग नसल्याने व्यावहार सुरळीत सुरु आहे. राज्यातील नाशिक, अहमदनगर, सांगली, परराज्यातून गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश इथून भाजीपाला आवक चांगली झाली असल्यामुळे दरही स्थिर राहिले आहेत.तसेच मुंबईसह ईतर शहरांतील जनजीवनावर या भारत बंदचा कोणताही परिणाम झालेला नाही.सार्वजनिक वाहतूक सुरळीत आहे. रेल्वे, रिक्षा, टॅक्सी व्यवस्थित सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button