breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय सीमेवर हाय अलर्ट, काश्मीर,पंजाबची विमानसेवा बंद

जम्मू काश्मीर – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे. वायूसेनेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार करत शस्त्रसंधींचं उल्लंघन केले जात आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून LoC वर गोळीबारच्या दरम्यान पाकिस्तानी लढाऊ विमानाने भारतीय वायुसीमाचे उल्लंघन केले आहे आणि सीमापार करत दोन विमानांनी भारतात प्रवेश केला. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे जम्मू-काश्मीर विमानतळ बंद करण्यात आले आहे.

लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट एअरपोर्टवर हाय अलर्टचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे येथील एअरस्पेस बंद करण्यात आले आहेत. अनेक व्यावसायिक विमानं रोखण्यात आली आहे. भारतीय एअरपोर्ट प्राधिकरणच्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरशिवाय पंजाबमधील अमृतसर एअरपोर्टही बंद करण्यात आलं आहे. पाकिस्तान जेट फायटर विमानाने भारतीय वायूसीमेचे उल्लंघन करत लाईन ऑफ कंट्रोल (एलओस) जवळ चार ठिकाणी बॉम्ब टाकण्याचाही प्रयत्न केला. भारतीय वायूसेनेच्या एअरस्ट्राईकमुळे श्रीनगर एअरपोर्ट येथील व्यावसायिक उडानं बंद करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांसाठी पुढील 3 तास रन-वे बंद ठेवण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button