TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

भारतात पहिल्यांदा ZP शाळेच्या शिक्षकाला 7 कोटींचा Global Teacher पुरस्कार

मुंबईसोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

आतापर्यंत देशातील कोणत्याही शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला नाही. तसेच भारताला पहिल्यांदा हा मान मिळाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाला हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचं खूप कौतुक केलं जात आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील मेहनतीमुळे हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

अवश्य वाचाः अपक्ष उमेदवार निता ढमालेंना अवघी 532 मते, आमदार अण्णा बनसोडे यांना

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार सोलापूरातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांना तब्बल 7 कोटी रुपयांचा निधीही मिळाला आहे. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम येथे झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

जगभरातील 140 देशांतील 12 हजारांहून शिक्षकांमधून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रसह देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केली. याचीच दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या कामामुळे महाराष्ट्राचा झेंडा सातासमुद्रापार फडकला गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button