Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/3narayan_rane2.jpg)
सोलापूर – भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुरातील बार्शी शहर पोलीस स्थानकात अदखालपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी तक्रार दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या निमित्त केलेल्या भाषणांनंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. दरम्यान निर्बुद्ध शिवराळ बरळणं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं, अशी टीका भाजपचे नेते नारायण राणे यांनी केली होती. याच विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रारी अर्ज देण्यात आला होता.