breaking-newsमहाराष्ट्र

भंडाऱ्याच्या शिवसेना जिल्हा प्रमुखाचा भाजपात प्रवेश

भंडारा : लोकसभा पोटनिवडणुकीच्या अगोदर शिवसेनेला भंडाऱ्यात मोठा धक्का बसला आहे. भंडाऱ्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

नागपुरात राजेंद्र पटले यांनी भाजपात प्रवेश करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने या निवडणुकीसाठी राजेंद्र पटले यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी नाराज होत भाजपात प्रवेश केला.

दरम्यान, भाजपला भंडाऱ्यात पुन्हा पोवार समाजाचा नेता मिळाल्यामुळे आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः भाजपला राजेंद्र पटले यांचा तुमसर विधानसभा मतदारसंघात फायदा होईल. शिवाय या लोकसभा पोटनिवडणुकीतही ते भाजपला मदत करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button