breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भंगारातून लाखो रुपयाची दारू वाहतूक! दोघांना अटक
![20 years hard labor for torturing a minor girl](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Arrest.jpg)
सिंधुदुर्ग प्रतिनिधी तुटलेल्या काचेच्या भंगारातून लाखो रुपयाची दारू वाहतूक केल्याप्रकरणी नांदेड व उत्तरप्रदेश येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांनी मोठ्या शिताफीने अटक केली.त्यांच्याकडून तब्बल 44 लाखांच्या दारूसह आठ लाख रुपये किमतीचा ट्रक,असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई काल शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास इन्सुली डोबवाडी फाटा येथे करण्यात आली.शेख सत्तार शेख कासिम पटेल (50) ,रा.नांदेड व मदन इंद्रजीत यादव (40) रा.उत्तरप्रदेश,अशी त्यांची नावे आहेत.दरम्यान आज या दोघा संशयितांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.याकामी अँड.स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.