Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी

मुंबई – ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार जास्तच अलर्ट झाले आहे. सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने मिशन बिगिनिंग अगेन अंतर्गत नवीन अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार युरोप, ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर कोरोनाची RTPCR टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला covid-19 च्या हॉस्पिटलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे. तर निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशाला सात दिवस घरामध्ये होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे.

वाचा :-जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लोकल सुरू होणार?

अध्यादेशात काय लिहिले आहे?

  • राज्यात येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये पेड क्वारंटाईन राहावं लागेल.
  • पाचव्या आणि सातव्या दिवशी RTPCR टेस्ट केली जाईल.
  • रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास 7 दिवसात सोडणार, मात्र घरात सात दिवस क्वारंटाईन राहावं लागेल.
  • रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कोविड हॉस्पिटलमध्ये 17 दिवस भरती

याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले. अन्य देशांमधून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button