breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
बेरोजगार- फ्रेशर्स यांच्यासाठी राज्य सरकारने ‘पोर्टल’ सुरू करावे : आमदार रोहित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/qarhe1yxqccuud5f_1584795004.jpeg)
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
फ्रेशर्स व बेरोजगार यांना नोकरीची संधी कळण्यासाठी व छोटे-मोठे सिव्हिल/लेबर कंत्राट घेणाऱ्या तरुणांना कामाची माहिती मिळण्यासाठी सरकारने स्वतंत्र पोर्टल सुरू करावं. तसे अस्तित्वात असेल तर ते अद्ययावत करावं. यामुळे भूमीपुत्रांपर्यंत नोकरी व व्यवसायाच्या संधी पोचून त्यांना फायदा होईल, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
शिवाय सरकारकडून केली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची खरेदी ही GEM पोर्टलमार्फत केली जाते. त्यामुळे आपलंही उत्पादन सरकारपर्यंत पोचेलं पाहिजे यासाठी अधिकाधिक नव उद्योजकांनी GEM पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.