breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘बुटाचं पॉलिश लावलेली दाढी वाढवून मनसेचा उमेदवार फिरत नाही’; राज ठाकरेंचा महाडेश्वरांना टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईमधून मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडला. राज यांनी सांताक्रूझ आणि गोरेगाव येथे सभा घेतल्या. सांताक्रूझ येथील सभेमध्ये त्यांनी खास ठाकरे शैलीत भाषण करत सत्ताधारी भाजपा-शिवसेनवर टिकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत असणारे मुंबईचे महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावरही टीका केली.

राज ठाकरे यांनी वांद्रे पूर्वमधील मनसेचे उमेदवार अखिल चित्रे यांची ओळख सभेमध्ये उपस्थितांना करुन दिली. अखिल यांना मंचावर बोलवून राज यांनी त्यांना आपल्या बाजूला उभे केले. ‘उगाच बुटाचं पॉलिश लावलेली एवढीशी दाढी वाढवून फिरत नाहीय,’ असा टोला राज यांनी अखिल यांची ओळख करुन देताना महाडेश्वर यांचे नाव न घेता केली. अखिल हे तरुण असून त्यांच्याकडे काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा आहे असंही राज यांनी मतदारांना सांगत अखिल यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. मी उभ्या केलेल्या प्रत्येक उमेदवारामध्ये तुमचे प्रश्न सरकार पुढे मांडण्याची हिंमत आहे त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष हवा असेल तर या उमेदवारांना निवडून द्या असंही राज यांनी यावेळी सांगितले.

वांद्रे पूर्व मतदारसंघामधून महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथील विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना शिवसेनेने डावललं आहे. सावंत यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनी मातोश्री बाहेर ठिय्या मांडला होता. २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत विजयी झाल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button