‘बायको असावी शिवसेनेसारखी, लफडी समजली तरी सोडत नाही’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Nitesh-Uddhav.jpg)
असंख्य नवरे बोलत असतील.. बायको असावी तर शिवसेनेसारखी लफडी कळली तरीही सोडत नाही. जास्तच जास्त तर काय एक सामन्यातून अग्रलेख बाकी संसार सुरु.. असा ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातला वाद सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी नितेश राणे सोडत नाहीत.
आमचे मंत्री राजीनामा देतील, सत्तेतून बाहेर पडू अशा घोषणा शिवसेनेने अनेकदा केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात शिवसेनेने सत्ता सोडलेली नाही. हाच मुद्दा पुढे करत नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
अहमदनगर महापालिकेत शिवसेनेची सत्ता येईल असे वाटत असतानाच भाजपाने राष्ट्रवादीला साथ देऊन सत्ता हिसकावली. ज्याचा समाचार सामनाच्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे. हाच संदर्भ घेत नितेश राणे यांनी ट्विटरवरून टीका करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. बायको असावी तर अशीच असेच असंख्य नवऱ्याना वाटत असेल असे म्हणत खोचकपणे निशाणा साधला आहे.