Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

बाबरी मशिदीवरुन ओवेसींचे ट्वीट, तर संजय राऊत यांच्या फोटोतून भावना व्यक्त

मुंबई: ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. भूमिपूजनाआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनीही बाबरी मशिदीवरुन ट्वीट केलेले आहे.

मंदिराच्या घुमटावर “श्रीराम – बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती” असे लिहिलेला फोटो संजय राऊत यांनी शेअर केलेला आहे. त्याखाली “गर्व से कहो हम हिंदू है” असेही लिहिलेले आहे. अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती असल्याच्या भावना राऊतांनी याआधीही अनेकदा बोलून दाखवलेल्या आहेत.

दुसरीकडे, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनीही भूमिपूजनाच्या दिवशी सकाळीच ट्वीट केलेले आहे. “बाबरी मशीद होती, आहे आणि राहील, इन्शाल्लाह” असे ओवेसींनी लिहिलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button