breaking-newsपुणेमहाराष्ट्र

प्रेमास नकार दिल्याने ऍसिड हल्ल्याची धमकी

  • हडपसर ठाणे हद्दीतील गंभीर प्रकार

पुणे – प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीस ऍसिड टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार भररस्त्यात घडला. याप्रकरणी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधीत तरुणी व तरुण अमरावतीमधील एकाच गावचे रहिवासी आहेत. दरम्यान, ही तरुणी उच्च शिक्षण घेतल्यावर पुण्यात एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला लागली होती. मात्र संबंधित तरुणाने एकतर्फी प्रेमातून तिला पुण्यात येऊन गाठले. येथे आल्यावर त्याने गुरुवारी तिला लग्न करण्याची गळ घातली. मात्र तिने नकार देताच “तुझ्यावर ऍसिड फेकून तुझा जीव घेईल,’ अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली .

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button