breaking-newsमहाराष्ट्र

प्रियंका गांधींच्या दिशेने ‘तो’ धावत आला, पुढे काय घडले ते बघा

लखनऊ – काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिवसाच्या निमित्ताने उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी या सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाच्या जागेवर उपस्थित नेत्यांसाठी आसनव्यवस्था केली होती. ज्या ठिकाणी प्रियंका गांधी बसल्या होत्या त्याच ठिकाणी प्रियंका यांच्याकडे एक व्यक्ती धावत-धावत आला. त्या व्यक्तीला प्रियंका गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी रोखलं. मात्र, त्याचवेळी प्रियंका गांधी यांनी त्या व्यक्तीला सोडण्याच्या सुचना सुरक्षारक्षकांना केल्या.

प्रियंका गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या व्यक्तीला सोडलं आणि तो प्रियंका गांधी यांच्याजवळ पोहोचला. यावेळी त्या व्यक्तीने प्रियंका गांधी यांच्यासोबत हात मिळवला आणि आपल्या भावना मांडल्या. प्रियंका गांधी आणि या व्यक्तीत नेमकं काय बोलणं झालं याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, प्रियंका गांधी यांनी या व्यक्तीचं संपूर्ण बोलणं ऐकूण घेतलं. यानंतर तो व्यक्ती पुन्हा आपल्या जागेवर गेला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button