breaking-newsमहाराष्ट्र

प्राण देण्यापेक्षा आमच्या जमिनी द्या ; शेतकऱ्याचे धनंजय मुंडेंना पत्र

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणासंबंधी नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाला जाहीर आव्हान दिले. त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारपासून वाचवण्यासाठी लढताना प्राण पणाला लावण्याची घोषणा केली.

धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर एका शेतकऱ्यांने त्यांना पत्र लिहिलं आहे, जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. परळी तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्याव्यात, जीव देण्याची गरज नाही, असे जाहीर पत्र तळणी येथील शेतकरी मुंजा गित्ते यांनी लिहिले आहे. जगमित्र शुगर्स या साखर कारखान्यानिमीत्त धनंजय मुंडे यांनी केलेले जमिनीचे व्यवहार वादग्रस्त ठरले असून यातील काही प्रकरणांची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याचं मुंजा गित्ते यांनी नमूद केले आहे. “प्राण देण्यापेक्षा आमच्या जमिनी परत द्या” या मागणीला धनंजय मुंडे काय प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

View image on TwitterView image on Twitter

Dhananjay Munde

@dhananjay_munde

राज्यातील महामार्गासाठी लागणा-या
शेतक-यांच्या जमिनी त्यांच्या सहमती शिवायही ताब्यात घेण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे. शेतकऱ्यांच्या सहमती शिवाय त्यांची एक इंचही जमीन मी ताब्यात घेऊ येणार नाही त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर. हा कायदा आम्ही कदापीही संमत होऊ देणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button