breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रधानमंत्री पीक विमा ऑनलाइन भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत

  • बजाज आलियांझ जनरल इंशुरन्स कंपनीचे विमा प्रतिनिधी प्रत्येक तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार

उस्मानाबाद | महाईन्यूज | प्रतिनिधी

प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) योजना अंतर्गत दिनांक 08 जुलै 2020 अखेर 85 हजार 213 शेतकऱ्यांनी पिक विमा ऑनलाईन भरलेला असुन पिक विमा ऑनालाईन भरण्याची अंतिम  मदुत 31 जुलै 2020 हि आहे. सध्या जिल्हयात कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असुन पिक विमा भरणेसाठी अंतिम मुदतीच्या वेळी विमा भरणेसाठी होणारी गर्दी टाळणेसाठी शेतकऱ्यांनी  अंतिम मुदतीची वाट न पाहता विमा भरुन घ्यावा व दुष्काळ, किड रोगाचा व्यापक प्रादर्भाव, पावसातील खंड, गारपीट, चक्रीवादळ, भूस्खलन, वीज कोसळणे, काढणी पश्चात नुकसान व हवामान घटकाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासुन पिक संरक्षित करावे, असे अवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.

तसेच शेतकऱ्यांना पिक विमा भरणे बाबत मार्गदर्शन करणे करीता किंवा तक्रार निवारण करणे करीता बजाज आलियांझ जनरल इंशुरन्स कंपनीने तालुका निहाय विमा प्रतिनिधींची नेमणूक केलेली असुन ते तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपस्थित राहतील.

विमा कंपनीच्या तालुकानिहाय प्रतिनिधींचा तपशिल खालील प्रमाणे

१)उस्मानाबाद- विमा प्रतिनिधीचे नाव रमाकांत मारुजी अर्जुने  संपर्क क्रमांक- 9130145836,

२) तुळजापूर-विमा प्रतिनिधीचे नाव सोमनाथ सुभाष लोहार संपर्क क्रमांक- 9767555702

3) उमरगा- विमा प्रतिनिधीचे नाव- विजय युवराज बिराजदार संपर्क क्रमांक-8623838783

4) लोहारा- विमा प्रतिनिधीचे नाव- गणेश पंडीत गावकरे  संपर्क क्रमांक -9404270007

5) भूम- विमा प्रतिनिधीचे नाव- सुधीर सुंदरराव मोहिते संपर्क क्रमांक-8788488325

6) परंडा- विमा प्रतिनिधीचे नाव- दिपक अरुण परकाळे- संपर्क क्रमांक-9403394913

7) कळंब- विमा प्रतिनिधीचे नाव- लखन श्रीराम माराळकर संपर्क क्रमांक -9325003717

8) वाशी- विमा प्रतिनिधीचे नाव- रामेश्वर साहेबराव सुरवसे- संपर्क क्रमांक -9403081038 असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button