breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

पुलवामातील शहीदांना दिव्यांग वैज्ञानिक देणार ११० कोटीची देणगी

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ४५ वर्षीय हमीद.ए.मुर्तझा यांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला ११० कोटी रुपयांची देणगी द्यायची इच्छा आहे. त्यांनी तसा प्रस्ताव दिला आहे. हमीद मुर्तझा सध्या मुंबईत राहत असून ते मूळचे राजस्थान कोटाचे रहिवासी आहेत. हमीद यांनी पंतप्रधान कार्यालयाला ईमेल पाठवून पंतप्रधान मोदींना भेटण्याची वेळ मागितली आहे.

हमीद यांनी कोटामधल्या कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी घेतली. ते जन्मापासून दीव्यांग आहेत. सध्या मुंबईत ते वैज्ञानिक म्हणून काम करतात. राष्ट्रीय मदत निधीचे उपसचिव अग्नि कुमार दास यांनी हमीद मुर्तझा यांना त्यांची माहिती पाठवयला सांगितली आहे. आपल्या मातृभूमीसाठी जीवन देणाऱ्यांना मदत आणि सहाय्य करण्याची इच्छा प्रत्येक नागरीकाच्या रक्तात असली पाहिजे असे हमीद म्हणाले.

आपल्या वैज्ञानिक शोधांना सरकारकडून वेळीच मान्यता मिळाली असती पुलवामा सारख्या दुर्देवी घटना रोखता आल्या असत्या असे त्यांनी सांगितले. फ्युल बर्न रेडिएशन टेक्नोलॉजीचा शोध लावल्याचा दावा त्यांनी केला. या तंत्राने जीपीएस किंवा कॅमेऱ्याशिवाय गाडी किंवा वस्तू शोधून काढता येत असे हमीद यांचे म्हणणे आहे. आपण या तंत्रासंबंधीचा प्रस्तावर सप्टेंबर २०१६ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सरकारला पाठवला. आपण हे मोफत द्यायला तयार आहोत. पण ऑक्टोंबर २०१८ मध्ये प्राथमिक मान्यता मिळाली. अजून पुढील प्रक्रिया बाकी आहेत असे त्यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button