breaking-newsपुणेमहाराष्ट्र
पुण्यापाठोपाठ कोल्हापुरमध्येही ‘डीजे’विरोधात पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : पुण्यानंतर कोल्हापुरमध्ये देखील शाहुपुरी पोलिसांनी डीजेविरोधात कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. डीजे सेट जोडणीसाठी घेऊन जात असलेल्या ४ बेस आणि ४ टॉप पोलिसांनी जप्त केले आहे. , पोलिसांनी जप्तीची कारवाई करत पोलिसांनी गणेश मंडळाना कडक संकेत दिले आहेत.
पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाकडून डॉल्बीला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुका पारंपरिक वाद्यानेच होणार आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यामध्ये पोलिसांनी डॉल्बीविरोधात धडक कारवाई करताना डहाणुकर कॉलनी जवळ एक मंडळाचा मिक्सर जप्त केला आहे.