Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
पुण्यात पतीने गोळी झाडून केली पत्नीची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/crime_201707718.jpg)
पुण्यातील चंदननगरमधील आनंद पार्क येथे पतीने पत्नीची गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एकता ब्रिजेश भाटी (वय ३८) असे या महिलेचे नाव असून या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
आनंद पार्क येथे राहणाऱ्या एकता या खानावळ चालवायच्या. बुधवारी सकाळी त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. एकता यांच्या पतीनेच हा गोळीबार केल्याचा आरोप असून या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.