पुण्यातील तुळशीबाग आणि महात्मा फुले मंडई सुरु होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/2020-06-01-2-1-1024x569-1.jpg)
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील अनेक भाजी मार्केट बंद आहेत. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळतायत. त्यापाठोपाठ पुण्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे पुण्यातील तुळशीबाग आणि महात्मा फुले मंडई या दोन बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र येत्या 5 जूनपासून या दोन्ही बाजारपेठा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान यात काही सम विषमचे नियम लागू करुन सम तारखेला एका बाजूची आणि विषम तारखेला दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जाणार आहेत. सोशल डिस्टेंसिंग आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करत या दोन मंडई सुरु केल्या जाणार आहे.
तुळशीबाग मंडईत 318 दुकानं आणि 376 पथारी व्यवसायिक आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने तुळशीबागेची पाहणी देखील केली. पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 8045 रुग्ण आढळले असून 338 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर 3793 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.