पुणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये उद्या बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/maratha-1.jpg)
पुणे – गुरुवारी राज्यभरात मराठा समाजातर्फे ठिकठिकाणी करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये व सर्व विद्यापीठे बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाकडून 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. रस्तोरस्ती मोर्चे व आंदोलने केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे वाहतूकीस अडथळा येण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उद्भवू शकत असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह अन्य अभिमत विद्यापीठांनाही विद्यापीठे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील वेळी झालेल्या बंदात काही समाजकंटकांनी स्कूलबस जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास अडचण झाली असल्याची बाब समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा शाळा व महाविद्यालय बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.