breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुढील आठवड्यात पाऊस सक्रिय होणार

पुणे – राज्यात पावसाने उघडीप दिली असून हा आठवडा ती कायम राहणार असल्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाची शक्‍यता आहे.

सध्या राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण आणि घाटमाथ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे.उर्वरित ठिकाणी मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.

मान्सूनचा प्रवाह सध्या कमी झालेला आहे. उत्तरेकडील राज्यात म्हणजे पंजाब, दिल्ली या परिसरात मान्सून सक्रिय होत आहे. त्यामुळे या भागात पाऊस पडत आहे. दक्षिणेकडील सर्वच राज्यात सध्या पाऊस ओसरला आहे. कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. हे क्षेत्र पूर्णपणे अॅक्‍टिव्ह होण्यासाठी एक आठवडा तरी लागणार आहे. त्यामुळे ऐवढा आठवडा तरी पाऊस राज्यात पडणार नाही, अशी चिन्हे आहेत.

धरणातील विसर्गही कमी
पावसाचा जोर ओसरल्याने जिल्ह्यातील बहुतांशी धरणातील विसर्गही कमी करण्यात आला आहे. सर्वाधिक विसर्ग हा खडकवासला धरणातून सुरू आहे. या धरणातून सध्या 5 हजार 136 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर वरसगाव धरणातून 2 हजार 664 क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील उर्वरित धरणातील विसर्गही कमी झाला आहे. चासकमान धरणातून सध्या 1 हजार 110 क्‍युसेक विसर्ग सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button