breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरियमसिंग पोलीस कोठडीत

मुंबई | महाईन्यूज | प्रतीनिधी

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेचे  माजी अध्यक्ष वरियमसिंग कर्तारसिंग यांना न्यायालयाने ९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेचे  माजी अध्यक्ष वरियमसिंग कर्तारसिंग यांना न्यायालयाने ९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीएमसी बँकेत ४ हजार ३५५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी वरियमसिंग यांना शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. माहीम चर्च परिसरातून त्यांना ताब्यात घेतले होते. रविवारी वरियमसिंग यांना  न्यायालयात हजर करण्यात आले असता ९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतर पीएमसी बँकेतील गैरव्यवहार समोर आले होते. हाऊसिंग डेव्हल्पमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) कंपनीला अवैधरीत्या कर्ज वाटप केल्यामुळे बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करत आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button