पीएनबी घोटाळ्यातील विपुल अंबानीचा तुरूंगवास लांबला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/pnb_-bank.jpg)
- महिन्यानंतर अर्जावर सुनावणी
मुंबई – पीएनबी बॅंक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या विपुल अंबानी याचा कारागृहातील मुक्काम आणखी एका महिन्याने वाढला आहे. याचिकेत दुरूस्ती करण्यासाठी अंबानीच्या वतीने ऍड. अमित देसाई यांनी न्यायालयाकडे वेळ मागुन घेतल्याने न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी जामीन अर्जावरील सुनावणी 5 जुलैपर्यंत तहकूब केली.
13 हजार कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यात विपुल अंबानीला सीबीआयने केलेल्या अटकेलाच ऍड. अमित देसाई यांनी जोरदार आक्षेप घेतला. सीबीआयने अंबानीला 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावून 20 फेब्रुवारीच्या रात्री 8च्या सुमारास अटक केली. त्यानंतर 22 फेब्रुवारला न्यायालयात हजर केले. 19 फेब्रवारीपासुन ते तेथेच होते हे अंबानीच्या मोबाईलवरील व्हॉट्स अप स्टेटसवरून ही बाब दिसून येते. याकडे ऍड. देसाई यांनी न्यायालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच मुळ अर्जात दुरूस्ती करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली.
सीबीआयने जामीन अर्जालाच जोरदार विरोध केला. विपुल अंबानीला फेब्रुवारीच्या रात्री सोडून देण्यात आले होते. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या या दाव्यात तथ्य नाही, असा दावा केला. न्यायालयाने अंबानीला मुळ अर्जात दुरूस्ती करण्याची परवानगी देत अर्जाची सुनावणी 5 जुलैपर्यंत तहकूब केली.