breaking-newsपुणेमहाराष्ट्र
पालिकेचा कनिष्ठ अभियंता बनला “क्लासवन’ अधिकारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/anup-bhatkar-main-..jpg)
महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागातील कनिष्ठ अभियंता अनूप भटकर यांनी नुकतेच राज्य लोकसेवा आयोग अर्थात “एमपीएससी’ परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. त्यांची असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स या ‘क्लासवन’ पदासाठी निविड झाली आहे. अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक. (इलेक्ट्रिक) उत्तीर्ण असलेले अनूप हे फेब्रुवारी 2017 पासून महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांची पाच एकर शेती असून सततच्या दुष्काळामुळे वडिलांनी रिक्षाचालकाचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या कष्टाचे चीज करत अनूप यांनी हे यश मिळविले आहे.