Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
पाटील इस्टेट झोपडपट्टीत पुन्हा आग; सहा घरं खाक
पुण्यातील शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला साधारण तीन महिन्यापुर्वी आग लागुन २०० पेक्षा अधिक घरं जळुन खाक झाली होती. या भयानक घटनेतून तेथील नागरिक सावरत असतानाच. पुन्हा एकदा याच झोपडपट्टीत काही घरांना आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा घरं खाक झाली आहेत.
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये सोमवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली, याबाबत माहिती मिळताच काही मिनिटातच अग्निशामक विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत सहा घरं खाक झाली होती. त्यानंतर काही वेळामध्ये नऊ गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. असा प्राथमिक अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.