Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
पाकिस्तानकडून होणाऱ्या छुप्या युद्धाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे! – राजनाथ सिंह संरक्षण मंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/rajnath-singh1.jpg)
महाईन्यूज | पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटनितीमुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद मोडीत काढण्यामध्ये भारत यशस्वी ठरला आहे. मात्र यापुढेही पाकिस्तानकडून होणाऱ्या छुप्या युद्धाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचं प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. इतर कोणत्याही देशाचा भूभाग बळकावणं हा आमचा हेतू नाही, मात्र भारतीय सीमांवर आक्रमण केल्यास ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला.
ते पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या १३७ व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यादरम्यान बोलत होते.