breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पश्चिम रेल्वेच्या रुग्णालयामध्ये प्रथमच अवयवदान

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयामध्ये शनिवारी प्रथमच अवयवदान करण्यात आले असून यामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले आहे. पश्चिम रेल्वेचे ६४ वर्षीय निवृत्त कार्यालय अधीक्षकांचे दोन्ही मूत्रपिंड, डोळे आणि यकृत दान करण्यात आले असून या वर्षभरातील हे २८ वे अवयवदान आहे.

पश्चिम रेल्वेचे निवृत्त कार्यालय अधीक्षकांना ९ जुलै रोजी रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. हातामध्ये गँगरिन झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानंतर ४८ तासांमध्ये त्यांचा मेंदू मृतवत झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांचे डोळे, दोन्ही मूत्रपिंड आणि यकृत या अवयवांचे दान करण्यात आले असल्याचे रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे अतिरिक्त मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. व्यंकटेश रेड्डी यांनी सांगितले. कुटुंबीयांनी अशा रीतीने पाठिंबा दिल्यास रेल्वे रुग्णालयांमध्येदेखील अवयवदानाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे ही पुढे रेड्डी यांनी सांगितले.  रेल्वेच्या रुग्णालयामध्ये प्रथमच अशा रीतीने अवयवदान करण्यात आले आहे. रुग्णालयाला अवयवदान आणि अवयवप्रत्यारोपणाची परवानगी नसतानाही सरकारच्या संबंधित विभागाने तात्काळ परवानगी दिली. त्यानंतर १६ जुलै रोजी केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या गटाने येऊन अवयव काढल्यानंतर अपोलो आणि केईएम रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button