पर्यटन कंपन्यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश, नवीन बुकींग घेण्यास आजपासून बंदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Uddhav-Thackeray-with-Health-Deapartment.jpg)
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाच्या संसर्गाचा वाढता आकडा लक्षात घेता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील पर्यटन कंपन्यांना पर्यटनासाठी नवे बुकिंग करू नये, असे आदेश दिले आहेत.
राज्यातील कोरोनाच्या संसर्गाचा वाढता आकडा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळले मात्र त्यांच्यात गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे या विषाणूची तीव्रता कमी झाली असेल तर समाधानाची बाब आहे. मात्र, विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाही. परदेशी गेलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून त्याचा फैलाव झाला आहे. कालपासून राज्यात तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. विविध देशांच्या दुतावासांशी देखील चर्चा केली जात आहे.”