breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘परदेशातून आलेले ब्राह्मण आम्हाला अक्कल शिकवणार का?

उर्जामंत्री नितीन राऊत यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

नागपूर – राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी CAA, NRC आणि NPR च्या मुद्द्यावरून केलेल्या एका आक्षेपार्ह टिप्पणीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. परदेशातून भारतात आलेले ब्राह्मण आम्हाला प्रमाणपत्र आणा म्हणून अक्कल शिकवत आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले.

ते नागपुरातील आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नितीन राऊत यांनी CAA, NRC आणि NPR विरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. हा व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नितीन राऊत यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

CAA, NRC आणि NPR ला काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसने २०१० साली जो NPR आणला होता, त्याच अटी आणि शर्ती कायम असतील तर NPR लागू करण्यास आमची हरकत नाही. अन्यथा आम्ही NPR लागू होऊ देणार नाही. माझ्या आजोबांचे ५० वर्षांपूर्वीचे प्रमाणपत्र मागवले तर मी देऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी दलित असताना सुद्धा शिक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे मी आजोबांचे प्रमाणपत्र आणू शकेन. पण, भटके-विमुक्त लोक प्रमाणपत्र कुठून आणतील? जे स्वत: परदेशातून येथे आले. ते ब्राम्हण आम्हाला अक्कल शिकवतील काय? हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही, अशी टीका नितीन राऊत यांनी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button