breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरपूर दुर्घटनाः दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

पंढरपूर |महाईन्यूज|

पंढरपूर शहरातील चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळून झालेल्या अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत. तसंच, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. संबंधित निकृष्ठ बांधकामाची चौकशी करून ठेकेदावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button