निकालामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
![SET exams will be held in 220 colleges on Sunday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/exam-student1_20171130899.jpg)
द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या विविध विषयांची देशभरातली शनिवारची नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आली. राम जन्मभूमी निकालाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अनेक भागांतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याने आयसीएआयने हा निर्णय संकेतस्थळावर जाहीर केला.
आयसीएआयकडून सीए फाउंडेशन, पेपर वन, फायनल पेपर फाइव्ह, आयआरएम पेपर वन, आयएनटीटी आणि डीआयएसए ईटी यांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्मभूमी खटल्याचा निकाल देण्यात येणार असल्याने सुरक्षिततेचा भाग म्हणून देशभरातील विविध भागांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि गैरसोय टाळण्यासाठी आयसीएआयने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले.परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयसीएआयचे कार्यकारी सचिव राकेश सेहगल यांनी संकेतस्थळाद्वारे स्पष्ट केले.