breaking-newsमहाराष्ट्र

नाशिकमध्ये टाकी स्वच्छ करताना गुदमरून कामगाराचा मृत्यू

अंबड एमआयडीसीतील एका कंपनीत पाण्याची टाकी स्वच्छ करताना बेशुद्ध पडलेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंदिरानगरच्या पांडवनगरीतील मुंजाभाऊ साहेबराव वंजारे (40) हे के.व्ही.पावडर कोटिंग कंपनीत काम करीत होते. ते 26 ऑगस्ट रोजी दुपारी कंपनीत पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना अचानक बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. विषारी वायुमुळे गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button