breaking-newsमहाराष्ट्र

नाना पटोले नितीन गडकरी यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणार

नागपूर : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत. नागपूरमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाने सांगितले तर मी गडकरींविरोधात निवडणूक लढणार असल्याचे पटोले म्हणाले. ‘भाजपने चॅलेंज केले होते की मला लोकसभा आणि विधानसभेत जाऊ देणार नाही, मला रस्त्यावर फिरण्यास भाग पाडतील. आता हे चँलेंज मी स्वीकारतो’ असे म्हणत नाना पटोलेंनी गडकरींविरोधात शड्डू ठोकण्याची तयारी केली आहे.

नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय आहे. यावरुनच नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी ही लढत प्रतिष्ठेची होणार हे नक्की. आता काँग्रेसनं नागपूरात नितीन गडकरींची कोंडी कऱण्यासाठी रणनीती आखली आहे. खरं तर पटोले यांचा भंडारा-गोंदिया मतदारसंघ आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळेच काँग्रेसने नाना पटोलेंना नागपूरातून उमेदवारी देण्याची तयारी केलीय. 2019 साली नितीन गडकरींची डोकेदुखी वाढणार का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button