breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
नागरिकत्व कायद्याचे समर्थन आमदाराला भोवले, बसपा पक्षातून हकालपट्टी
नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील पथेरियाचे बसपाच्या आमदार रमाबाई परिहार यांनी पक्षाविरोधात जात या कायद्याचे समर्थन केले होते. यामुळे बसप पक्षाने रमाबाई यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोध देशभरात आंदोलन होत आहे. तर दुसरीकडे या कायद्याच्या समर्थनात मोर्चे आणि रॅली काढण्यात येत आहे. या कायद्याबाबत मायावती या म्हणाल्या की, “बसपा हा शिस्तबद्ध पक्ष आहे. शिस्तभंग केल्यास पक्षाचे आमदार/खासदार इत्यादींवर तत्काळ कारवाई केली जाते. यामुळे पथेरिया येथील बसपाच्या आमदार रमाबाई परिहार यांनी नागरिकत्व कायद्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना पक्षातून निलंबित केले. तसेच पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेण्यास त्यांच्यावर बंदी आहे.”