नांदेडमधील भाजपा खासदार चिखलीकरांना कोरोनाची लागण
नांदेड – नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुलापाठोपाठ चिखलीकरांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. या दोघाही पिता-पुत्रांना उपचारासाठी औरंगाबादेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यापासूनच चिखलीकर पिता-पुत्र दोघेही सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे चिखलीकर कुटुंबियांकडून सांगण्यात आले. चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याआधी काँग्रेसच्या चार आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.