breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवजात अर्भकाला शौचालयात सोडले, मुलीने पळ काढला

बेळगाव – अथणी तालुक्यातील यंक्कची या गावातील हायस्कुल मधील शाळेच्या स्वच्छतागृहात एका गर्भवती महिलेने स्त्रीअर्भकाला फेकण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती.

पोलिसाने या घटनेची कसून चौकशी केली असता वेगळेच प्रकरण समोर आले आहे. दहावीत शिकणाऱ्या एका गर्भवती मुलीनेच या मुलीला जन्म दिला व तिथेच सोडून पळ काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शाळेतीलच शिक्षक भीमाप्पा बसाप्पा कुंभार (31) राहणार (कोहळ्ळी) दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करत होता. त्यामुळे ती मुलगी गर्भवती राहिली होती. नराधाम शिक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

कोहळ्ळी गावात राहणारा शिक्षक भीमाप्पा हा यंक्कची येथे हायस्कुलमध्ये शिक्षक होता. त्याच शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीबरोबर त्याने लैंगिक संबंध ठेवले. त्यातूनच ती विद्यार्थिनी गरोदर झाली. त्याने हे प्रकरण कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. गर्भवती मुलगी गरीब कुटुंबातील होती. त्यामुळे घरच्यानाही काही करता आले नाही. गेल्या शनिवारी तिने शाळेतील शौचालयात मुलीला जन्म दिला. तेथेच तिने स्त्री अर्भकाला टाकून पळ काढला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button