धावत्या लोकलमध्ये प्रवाशाला लुटले
![Unnatural atrocities on an eleven-year-old boy in Alandi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/crime-2.jpg)
मुंबई | महाईन्यूज | प्रतीनिधी
उपनगरी रेल्वेमधील मालडब्यात प्रवासी एकटाच असल्याचे पाहून तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुटल्याची घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. रे रोड ते कॉटनग्रीन दरम्यान धावत्या उपनगरी रेल्वेमध्ये घडलेल्या घटनेत आरोपींनी प्रवाशाला मारहाणही केली.
२६ वर्षीय प्रवासी आफाक शेख जखमी या घटनेत जखमी झाला. मोबाइल व रोख रक्कम असा १६ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लुटला. याविरोधात वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही नेमले आहे.
आफाक शेख हा नेरुळ येथे राहतो. काम संपवल्यानंतर त्यांने पहाटे पाऊणे पाचच्या सुमारास सुमारास सॅन्डहर्स्ट रोड स्थानकातून पनवेलला जाणारी उपनगरी रेल्वे पकडली. त्यावेळी शेख हा उपनगरी रेल्वेच्या मधल्या मालडब्यातून प्रवास करत होता. मस्जिद स्थानकातून याच उपनगरी रेल्वेने प्रवास करत असलेले तीन जणांनी सॅन्डहर्स्ट रोड स्थानकात उतरून आफाक शेख मालडब्यात एकटाच असल्याचे पाहिले आणि त्या डब्यात प्रवेश केला. रे रोड स्थानक सोडताच डब्यात चढलेल्या तिघांनी शेख याच्याकडे मोबाइल आणि पैशाची मागणी केली. यातील एकाने त्यासाठी चाकूचा धाक दाखविला. परंतु त्याला विरोध केल्याने त्याच्याबरोबर शेख यांची झटापटही झाली. त्याच वेळी दुसऱ्या एका आरोपीने आपल्याजवळील चाकूच्या मुठीने शेखच्या कानाला मारले. त्यामुळे कानाच्या आतील भागात जबर दुखापत झाली. कॉटनग्रीन स्थानक येताच शेखजवळील १३ हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि तीन हजार रुपये रोख रक्कम घेऊन तिघांनी पळ काढला. शेखने याची माहिती स्थानकातील पोलिसांना दिल्यानंतर वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.