breaking-newsमहाराष्ट्र

धनगर आरक्षणावरून विधान परिषदेत गदारोळ

  • सभागृहाचे कामकाज तहकूब

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजला. विशेष म्हणजे विरोधी पक्षाबरोबरच सत्ताधारी पक्षानेही गदारोळ केल्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

त्यापूर्वी धनगर आरक्षण व काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या वादग्रस्त विधानावरून दोन वेळा कामकाज तकहूब करावे लागले होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह १६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहात मांडला जाणार होता. त्याला बगल देण्यासाठीच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

धनगर समाजाला आरक्षणही दिले जात नाही आणि त्यांच्या संदर्भातील अहवालही सरकार सभागृहासमोर आणत नाही असा आक्षेप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घेतला, तर, भाई जगताप यांनी असंसदीय शब्द वापरल्याने ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी घेतली. यावेळी स्थगन प्रस्तावाद्वारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण उपस्थित करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांच्या गदारोळामुळे दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. तत्पूर्वी भाई जगताप यांचे विधान तपासून सोमवारी आपण निर्णय देऊ असे सभापतींनी जाहीर केले. सोळा मंत्र्यांच्या घोटाळ्याची प्रकरणे शुक्रवारी मांडण्यात येणार असल्यामुळेच सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालून मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला वाचू फोडू दिली नाही, असा आरोप माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button