breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
धक्कादायक! सापडला शिर नसलेला मृतदेह
मुंब्रा | महाईन्यूज
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ नजीक असलेल्या दहिसर मोरी परिसरातील ठाकूरपाडा येथील डोंगरमधील झाडीत शिर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. घटनास्थळी पोलिसांचे श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक हजर झाले असून तपास सुरु आहे.
हा पुरुषाचा मृतदेह असून श्वान पथकाच्या सहाय्याने पोलीस झाडीत शिराचा शोध घेत आहेत. मात्र, ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.