Breaking-newsमहाराष्ट्र
धक्कादायक! मुलं पळवण्याच्या संशयावरून ५ जणांची ठेचून हत्या
![Truck Driver beaten up by two for honking for side on road](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/crime-12-1_20171130256.jpg)
धुळे: महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात रविवारी गावकऱ्यांनी पाच जणांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे पाचही जण सोलापूरचे आहेत. मुलं पळवल्याच्या संशयावरुन यांची हत्या करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र गावकऱ्यांनी पोलिसांनाही मारहाण केली. यामध्ये २ पोलीस जखमी झाले आहेत. गावात मुलं पळवयाला टोळी आली, अशी अफवा पसरली. या अफवेमुळे सोलापूर येथून आलेल्या ७ मधील ५ जणांना गावकऱ्यांनी ठेचून मारले. आणि त्यांचे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात टाकून दिले.
मृतदेह जवळच्या पिंपळनेर रुग्णालयात नेण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.