breaking-newsमहाराष्ट्र

दौंड विधानसभा जिंकन्याचा राष्ट्रवादीच्या पदधिकाऱ्यांचा निर्धार!!

दौंड (प्रतिनिधी):- दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाचे दौंड विधानसभा मतदार संघाचे पक्ष-निरीक्षक बापूराव सोलनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश आप्पा थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस च्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशालिताई नागवड़े, तालुका अध्यक्ष, आप्पासाहेब पवार,  जिल्हापरिषद सदस्य वीरधवल जगदाले, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सोहेल खान, दौंड पंचायत समिती सभापती ताराबाई देवकाते, दूध संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ टुले, उमेश म्हेत्रे, तसेच दौंड तालुका खरेदी विक्री संघ, नगरसेवक व तालुक्यातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बापूराव सोलनकर यांची पक्ष-निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वप्निल गाटे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या दौंड शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात अली.

यावेळी बापूराव सोलनकर यांनी पक्षातील प्रमुख पदधिकार्यांनी विधानसभा, जिल्हापरिषद गट-गणामध्ये दौरे व मेळव्याचे आयोजन करावे,  बूथ प्रमुखाशी संपर्क करावा.बूथवर लक्ष केंद्रित करावे,  सर्व जाती धर्मातील लोकांशी संपर्क करावा. असे सोलनकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुक्यातील स्तिथी चांगली आहे, यावेळी विधानसभेला निश्चित यश मिळेल, कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे यावेळी रमेश थोरात म्हणाले.

यावेळी वैशालिताई नागवड़े, पांडुरंग मेरगळ, वीरधवल जगदाले, सोहेल खान यांची भाषणे झाली.
या बैठकीचे आयोजन तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी केले,

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button