दोन तोंड, तिन शेपटी, सहा पाय असणारं जन्मले रेडकू, पाहण्यास लोकांची गर्दी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/13-4.jpg)
नांदेड |महाईन्यूज|
मुदखेडात एका म्हैशीला दोन तोंडांचा रेडकू जन्मला आला आहे. सरेगाव (ता. मुदखेड) येथील एका शेतकऱ्याच्या घरी त्यांच्या म्हैशीच्या पोटी विचित्र रेडकू जन्माला आले आहे. हे जन्मलेले रेडकु म्हणजे पंच क्रोशीतील लोकांच्या कुतुहलचा विषय बनला आहे.
सरेगाव (ता. मुदखेड) येथील शेतकरी माधव सखाराम गिरे पाटील यांनी चार महिण्यापुर्वी मुदखेडच्या बाजारातुन गाभन असलेली एक म्हैस खरेदी केली होती. त्या म्हैशीचे संगोपन चांगले केले. म्हशीने बुधवारी (ता.११) रोजी दुपारी चार वाजता माधव गिरे यांच्या रहात्या घरच्या गोठ्यामध्ये एका रेडकुला जन्म दिला.
जन्मलेले पिलु हे विचित्रच अवस्थेत जन्मलेले हे पाहुन कुटुंबासह सर्वांना एक आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. या म्हशीने जन्म दिलेले रेडकु हे मोठे आश्चर्य जनक आहे. हे वासरू म्हणजे ग्रामीण भाषेत हाल्या ( रेडकुस) आहे. या रेड्यास जन्मतः दोन तोंड आत, तिन शेपटी, सहा पाय आहेत या रेडकुसाची लांबी साडेपाच फुट तर उंची तिन फुट आहे. सध्या तो जीवंत आहे.
माधव गिरे पाटील यांची म्हैस त्यांच्या घरी चौथ्यांदा जनली (इली) आहे. पुर्वीच्या मालकाच्या घरी तिन वेळा इली आहे. पुर्वीचे कालवड व रेडा चांगले जन्मले हे पहिल्यांदाच असे विक्रृत रेडकु जन्मल्याचे त्यांचेकडुन सांगण्यात आले. आमच्या गावात एखाद्या पाळीव दुभत्या प्राण्यांच्या पोटी असे विचित्र वासरू जन्माला येण्याची पहिलीच वेळ आहे, असेही सांगितले.