breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘दोन्ही छत्रपतीं’नी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा – शरद पवार

पंढरपूर |महाईन्यूज|

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार. दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, असा खोचक टोलाही पवार यांनी लगावला आहे.

शरद पवार आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी सांगितलं की, संजय राऊत यांनी फडणवीस यांची घेतलेल्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढायचे कारण नाही. राऊत यांनी माझी ही मुलाखत घेतली होती. चंद्रकांत पाटील यांनी ही मुलाखत राजकीय असल्याचे वक्तव्य केले होतं. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, अशा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे सरकारला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते , माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि हभप रामदास महाराज कैकाडी ( जाधव ) या तीन दिग्गज व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाल्याने पवार हे या तीनही सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

रामदास आठवलेंना फटकारलं…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोणी ही गंभीर घेत नाही, सभागृहातही आणि बाहेरही. त्यांचा एकही आमदार नाही किंवा खासदार नाही, अस ते सर्वांना मार्गदर्शन करीत असतात म्हणत आठवले यांना टोला लगावला.

संजय राऊत यांनी फडणवीस यांची घेतलेल्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढायचे कारण नाही. राऊत यांनी माझी ही मुलाखत घेतली होती. त्यावेळीच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती घेणार असं जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचे कोणतेही कारण नाही’, असंही शरद पवारांनी स्पष्ट केले.

‘राज्यात मध्यावधीची शक्यता नाही’

त्याचबरोबर भजापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही दोन्ही नेत्यांची भेट ही राजकीय असल्याचे वक्तव्य केले होते तसंच राज्यात सध्या मध्यावधी निवडणूक होण्यासारखी परिस्थिती आहे. ‘ असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाष्य करत शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकाचे खंडन केले आहे.

‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले आहे. महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे. सरकाराला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षे टिकेल’, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button